Monday, 15 October 2018

लघु कथा : नेटिव्ह म्हणजे ?

काही दिवस पूर्वीची हि गोस्ट आहे . मी आणि माझा एक कार्यकता मित्र आम्ही आमच्या वार्डात काही फार्म वाटायला निघालो . आधी फार्मचे ५० झेरॉक्स करून घेतले . फार्म २ पानी होता म्हणजे १०० झेरॉक्स .अलीकडे झेरॉक्स चे पैसे हि वाढले आहेत एका कॉपी चे २ रुपये . चांगला गठ्ठाच झाला समजायचे . मित्राने थोडे फार्म घेतले मी थोडे आणि एक रजिस्टर सुद्धा घेतले नाव , गाव इत्यादी लिहिण्या साठी .

घरून बाहेर पडलो , मित्रा कुठं जायचे मला मित्राने विचारले मी म्हणालो अरे काम साधेच आहे चल कुठल्याही चाळी पासून सुरू करू , रस्त्या पलीकडे दहा चाळीची वस्ती होती . तिला दहा चाळ म्हणूनच ओळखले जायचे !

दिवसाचे १० वाजले होते , दिवस सुट्टीचा म्हणजे रविवार चा होता . चाळीतले लहान पोर दोन दोन चाळीतील गल्लीत खेळात होते बाया मंडळी घराच्या दारा पुढे सफाई , रांगोळी टाकत होत्या आणि मोठी माणसे काही पेपर वाचीत तर काही एक -दोन च्या ग्रुप मध्ये गप्पा करीत दिसत होते , बऱ्याच घरचे टीव्ही सुरू होते आणि मालिका सुरू होत्या.

आम्ही पहिल्या खोली च्या दारा पुढेच उभे झालो . नवीन कोणी आला कि हा कोण हि उत्सुकता सर्वानाच असते , घरच्या लोकांच्या चेहऱयावर ते दिसत होतेच . मित्र म्हणाला नमस्कार ! घरचे लोक समजून गेले हे लोक शिव सेना , मनसे वाले नाहीत नाही तर जय महाराष्ट्र केला असता , बीजेपी वाले असते तर उसानेच भारत माता कि जय , राम , राम केला असता . अलीकडे हे लोक जय श्री राम म्हणत आणि नाही तर लोक विचारतात , राम मंदिर कब बनायेंगे ? घरचे लोक समजून गेले कि आम्ही रिपाई ,जय भीम वाले नाही नाही तर मोठा जय भीम ठोकला असता !

नमस्कार ! दारा वरच्या बुजरुग माणसाने प्रतिसाद दिला ! मित्र म्हणाला आम्ही नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट चे कार्यकर्ते . हे राऊत आणि मी विसपुते .
बर ! बोला तो घरचा मालक म्हणला . आम्ही तुम्हाला एक फार्म देण्यासाठी आलो . बर तो घराचा मालक परत म्हणाला . असा हा आमचा संवाद दारावरच ! काय मन्हाला तुम्ही ? तुम्ही शिवसेना , मनसे , बीजेपी, काँग्रेस , जय भीम वाले नाही ? हि काय भानगड आहे नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट ? आणि हा कसला फार्म देता ? त्याच वेळी त्यांचे घरचा एक १३ -१४ वर्ष्याच्या पोरगा डोकावला आणि म्हणाला अहो बाबा नेटिव्ह म्हणजे गाव वाले ! आमच्या टीचर ने सांगितले आहे नेटिव्ह म्हणजे गाव , तुमचे गाव काय ? तर आपले गाव सांगायचे . आपले मूळ गाव पारनेर आहे ना तुम्हीच सांगितलेले . नेटिव्ह मन्हजे मूळ ! मूळ गाव वाले तसे देश वाले !

होय बेटा आम्ही तुमच्या गाव चेच , गाव वाले च ! आपला देश आता आपला मोठा गावच नाही का ?

काय काम ? कसली पूजा , कसला चंदा ? मी म्हणालो चंदा नको . थोडं ऐकून घ्या , वेळ नाही हो , १० रुपयाची पावती फाडा !

मी म्हणालो आम्ही पावती फाडायला नाही आलो , देहदान , अवयवदान या बद्दल सांगायला आलो आणि इच्छा असेल त्याचा फार्म भरून घ्यायला आलो .

अहो अजून मारायला वेळ आहे ! ते गृहस्थ म्हणले . हे सरकार सुखासुखी मरू देईल तर ना !

नंतर या म्हणून त्यांनी आम्हाला वाटेल लावले . दुपारचे २ वाजले होते , दहा चाळीतले सर्व घर झाले होते , अनुभव जवळपास असाच होता . उद्या या , नंतर बघू , चार रुपयाचा फुकटचा फार्म सुद्धा कोणी घ्यायला तयार होई ना , रजिस्टर पुढे केले कि नंतर या त्यांचे ठराविक उत्तर !

मित्र म्हणाला , देहदान नंतर बघू आधी देह पोट पूजा करून घेऊ !

घरी परत आलो ३ वाजले होते देह काव काव करीत होता !

#जनसेनानी #Jansenani कल्याण १५ आक्टोबर , २०१८

No comments:

Post a Comment