Sunday, 1 July 2018

गीत : शेतावरती जाऊ या !

ऐक कारभारीनी
मी तुझा मुंगडा ,
तू माझी मुंगडी
शेतावरती जाऊ या
उसाचा रस पूवु या !

उसाच्या खोडांनी
धरलाय मूळ
वरी वारा
खेळतोय खट्याळ
हिरव्या पाल्याचा
उठतोय जोर
सखे शेतकरींनी
झाडांना पाणी देऊ या
शेतावरती जाऊ या !

उसाचा पेर
झाला लयी भारी
रसाचा थेंब थेंब
जोर मारी
पेरा पेरात
उठते चित्कारी
हिरव्या पानाशी
करते खत्याळी
माझे कारभारीनी
त्यांना गहिवरून
कवेत घेऊ या
शेतावरती जाऊ या !

रसाचा सुटलाय दरवळ
मुंगळा मुंगळीची
चाललीय धावपळ
बांध्या बांध्या वरून
होते पळापळ
प्रिया साजणा संख्या
त्यांच्या गोडीचा
आस्वाद घेऊ या
शेतावरती जाऊ या !

#जनसेनानी , #Jansenani कल्याण
२ जुलै , २०१८

No comments:

Post a Comment