Sunday, 19 August 2018

हिंदू धर्म :

सत्य शिव सुंदर
हिंदू धर्म मनोहर
निसर्ग हाच धर्म
निसर्ग हेच कर्म !

नित्य नेम घ्यावे नाम
राम हेच सत्य जाण
शिव धर्म सांगितला
कृष्ण तो उपदेशाला !

कबीर वाणी झाला धर्म
सत्य वक्ता सत्य मर्म
सत्य बोला तो म्हणाला
म्हणे तसा तो चालला !

हत्या ना व्हावी जनाची
जीवन आवड हि सर्वांची
चोरी चाकरी ना करावी
लोक लाज मनी धरावी !

मादक पेय्य ना घ्यावे
ना दुसऱ्याला घेऊ द्यावे
असभ्य वर्तन करू नये
समाज भान विसरू नये !

चोरी चकारी बरी नव्हे
हि जिंदगी खरी नव्हे
असा सुलभ दिला धर्म
पाळू नका ब्राह्मण अधर्म !

वेद भेद वर्ण उचनीच जाती
हि सर्व अनौपजावु माती
सत्य हिंदू धर्म इथे संपतो
अधर्मी ब्राह्मण हा वाढतो !
होम हवन जानवे नव्हे धर्म
हे तर फसगतीचे ढोंग कर्म
देव ब्रह्मा ब्राह्मण अनित्य जाण
कधी ना द्यावे त्यांना मान !
असा सुलभ सरल हिंदू धर्म
कबीरांनी सांगितले त्याचे मर्म
हिंदू नेटीवांनी ते अंगीकारावे
अमूल्य जीवन सार्थक करावे !

#जनसेनानी #Janasenani कल्याण
२० आगस्ट , २०१८

No comments:

Post a Comment