Saturday, 4 August 2018

आपले ध्येय !

आपल्या ध्येयाचे ओझे स्वतःच वाहायचे असते
येशु सारखे आपल्याच खांद्यावर घ्यायचे असते
आपल्याच क्रूसाचे धुड घेऊन चालायचे असते
जण विरोधकांचे असंख्य वार झेलायचे असते

तुमच्या ध्येयाचे ओझे टाकता येत नसते अन्य कुणाच्या खांद्यावर
खरं म्हणजे कुणाचंच खांदे मोकळे नसतात तुमच्या ध्येयाच्या नावावर
मात्र हवे तेव्हा पुरायला मिळतील चार खांदे एका पायावर
वाजत गाजत केव्हाही पोहचवतील तुमचे ध्येय तिरडीवर

तुमच्या ध्येयाशी दुसर्यांना काही देणे घेणे नसते
तुमचे ध्येय समाजउपयोगी , परोपकारी तरी वागवत नसते
तुमचे ध्येय साध्य होणे कोणाला पाहवत नसते
तुमच्या ध्येयाशी आपले ध्येय जोडणे कोणाला मानवात नसते

आपल्या ध्येया साठी आपलेच बलिदान द्यायचे असते
आपल्या ध्येया साठी आपलेच खिसे खाली करायचे असते
आपल्या ध्येयाला साठी सर्वांशी मिळते घ्यायचं असते
आपल्या ध्येय साठी आपलंच वेळ खर्च करायचे असते

शिकताना मोठे ध्येय निबंधात लिहायचे असते
बालपणातील ध्येय धरून बसायचे नसते
तारुण्यातील ध्येय काही वेगडेच असते
म्हातारपणात ध्येय विसरून जायचे असते

मुलांच्या उच्च शिक्षणाचे ध्येय पालकांनी धरायचे असते
राजकारणात मोठ्या खुर्चीचे ध्येय ठेवायचे असते
व्यवहारात जास्त फायद्याचे ध्येय गाठायचे असते
नौकरीत मोठ्या पगाराचे ध्येय बाळगायचे असते

आपले खरे ध्येय कुणाला कधी सांगायचे नसते
नाही साध्य झाले तर कुढत बसायचे नसते
अपयश साठी कधी कुणाला दोष द्यायचे नसते
ध्येय आठवून आठवून कधी रडत बसायचे नसते

पुरलेल्या आपल्या ध्येयाच्या थडग्यावर परत कधी जायचे नसते
आठवणींच्या सुमनांची अंजली परत कधी वाहायची नसते
अपयशाच्या धरलेल्या खपल्या परत उकरून घ्यायचे नसते
परत परत तेच तेच ध्येय असे कधी करायचे नसते

सांसारिक येणाऱ्या जाणाऱ्या ध्येयानंi नीट ओळखायचे असते
एकदा ध्येय साध्य झाले म्हणून फार हरकून जायचे नसते
सर्व गोर , गरीब , नेटिव्ह जणांच्या सुखाचे भान ठेवायचे असते
निर्वाणाचे अंतिम ध्येय मानवाने कधी विसरायचे नसते

#जनसेनानी #Jansenani कल्याण
५ आगस्ट , २०१८

No comments:

Post a Comment