माझ्या गावाच्या भिंती :
माझ्या गावाच्या भिंती
आता कश्या स्वच्छ दिसायला लागल्या आहेत
पोस्टर शिवाय आता
त्या तर उदास दिसायला लागल्या आहेत
शाळेत , बाजारात जात होतो
वाचत होतो भिंतीवरचे पोस्टर अन कार्यक्रम
समजत होत काय चालले गावात
जिगन्यासात गेले बालपण
चलेजाव समजले भिंती वरून
गांधी , फुले , आंबेडकर समजले भिंती वाचून
अन्यायाची चीड आली
कम्युनिस्ट आणि नेटिविस्ट हि समजली
पण मनुवाद्यांचा कायदा आला
भिंती रंगवणे , पोस्टर लावणे वर बंदी आली
आता माझं गाव दिसत आहे स्वच्छ
पण भकास आणि उदास
गावातील जीवंतपण हरवलं आहे
पांढऱ्या भिंतीवर अधून मधून
कुत्रे पाय उचलून मुतत आहेत
चलेजाव समजले भिंती वरून
गांधी , फुले , आंबेडकर समजले भिंती वाचून
अन्यायाची चीड आली
कम्युनिस्ट आणि नेटिविस्ट हि समजली
पण मनुवाद्यांचा कायदा आला
भिंती रंगवणे , पोस्टर लावणे वर बंदी आली
आता माझं गाव दिसत आहे स्वच्छ
पण भकास आणि उदास
गावातील जीवंतपण हरवलं आहे
पांढऱ्या भिंतीवर अधून मधून
कुत्रे पाय उचलून मुतत आहेत
मनुवादी आंनदाने हसत आहेत
बाया बापड्या शेतात मोलमजुरी ला जायची
पोस्टर वाचून आम्ही सायंकाळी
घरच्यांना इतंभूत बातम्या द्यायची
स्वात्यंत्र लढ्याची ज्योत पेटली होती त्यातून
क्रांतीची मशाल धग्धगली होती याच
पोस्टर आणि भिंती पेंटिंग च्या वणव्यातून
आता मनुवाद्यांनी चालविली आहेत
वृत्त पत्रे आणि टीव्ही चॅनल अनेक
करोडोपतीच्या सिरीयल , कथा कहाण्या
पडताहेत आम्हाला भुरड
आमचे स्वराज्याचे स्वप्न अजून अधुरेच आहे
माझ्या गावची भिंत स्वच्छ आणि उदास आहे
गेरू , निळी शाई ची वाट पाहत आहे
नवं सूर्योदयाची वाट पाहत आहे
#जनसेनानी #Jansenani कल्याण
३ आगस्ट , २०१८
No comments:
Post a Comment