अरण्यातील प्रवास :
खूप लोकांनी लिहल्या आहेत कविता जीव ओतून
कुणी तुतारी फेकून तर कुणी नगारे ,ढोल ठोकून
माझ्याही कवितेत आहे जीवनाचे तेच तत्वज्ञान
आणि जीवन मरणाचे तेच अनुत्तरित प्रश्न अन प्रश्न
मग मी वेगळा कवी कसा हे कसले कवित्व
यात काय आहे वेगडे मूल्य आणि सत्व
माझ्या कवितेत आहे अरण्य कंदन माझ्या जीवाचे
पृथ्वी वर पाठवलेल्या एकाद्या त्या आदमचे
मी आहे कविता माई हवा हवाई
म्हणूनच ठरली कविता एक बाई
काल दुसऱ्याच्या डोक्यात जाई
आज माझे जवळ घुटमळत राही
भावना, इच्छा, आकांक्षा या तिच्या भगिनी
करतो त्यांची भलामण प्रत्येक दिनी क्षणी
पण समाधान त्यांचे , त्या मायी चे होत नाही
करतो काव्य त्यांचे पण कवित्व सरत नाही
केव्हा स्फूर्तील मला अमर अजर कविता
केव्हा वाहील जीवनात निर्वाणीची सरिता
केव्हा माझे कवित्व पूर्णत्वास जाईल
केव्हा माझा हा अरण्यातील प्रवास पूर्ण होईल !
#जनसेनानी #Jansenani कल्याण
No comments:
Post a Comment