Sunday, 3 June 2018

शोध नेटिव्ह चा :

मराठीच्या चवथी तुन पाचवीत गेलो
त्याच बरोबर इंग्रजीवाशी झालो
पहिले शिकलो ए बी सी वन टू थ्री
मग शब्द आणि ग्रामर आणि मार

गुरुजीं न विचारलं प्रथमच
व्हॉट इस युअर नेटिव्ह प्लेस
मी म्हणालो माहीत नाही
सगळा वर्ग हसला आणि गुरुजीही

मग गुरुजीने सांगितले नेटिव्ह चा अर्थ
नेटिव्ह म्हणजे जन्म स्थान , कायम ठिकाण
जसे असतात आदिवासी ,जुने निवासी
जसे स्वकीय , स्वदेशी

मग मी विचारले मी मूळ भारतीय ना
इंग्रज , ब्राह्मण विदेशी बरोबर ना
गुरुजींनी केला थोडा वेळ विचार
पण नाही करत याचा कोणी प्रचार

तेव्हा पासून माझ्या डोक्यात
नेटिव्ह , नेटीव्हीसम राहिले
मोठा झालो जरासा तेव्हा
स्वतःला नेटिविस्ट म्हणून पाहिले !

#जनसेनानी #Jansenani कल्याण
३ जून , २०१८

No comments:

Post a Comment