लघु कथा : माझाही शोध, पळसाला पाने तीनच !
घरी लहान म्हटलं कि बरेच फायदे आणि बरेच तोटे सुद्धा नाही का ? शाळेतून माझा मोठा मास्टर भाऊ येताना दिसला तर एक तर तो मला आवाज देऊन बोलवून घ्यायचा नाही तर त्याला काही काम असेल म्हणून मीच खेळ टाकून त्याचे बरोबर घराला यायचा .
खरं म्हणजे मी सुद्धा जाणत होतो मोठा भाऊ शाळेत शिकवून घरी आला कि मागच्या ४ -५ वर्ष्या पासून काढलेल्या शिक्षण संस्थेचा सचिव म्हणून आणि नवीनच काढलेल्या विध्यर्थी हॉस्टेल च्या कामाला लागतो , हिशेब लिहणे , मिनिट्स लिहणे , मीटिंग बोलवणे , अडले नाडले पाहणे , हॉस्टेल मध्ये आपल्या मुलांना टाकू इच्छिणाऱ्या खेडूत ,शेतकरी पालका बरोबर बोलणे , भाजी पाला ते गहू तांदूळ , पीठ , सरपण इथं पर्यंत सर्व तो पाहत असे तेव्हा त्याला काही ना काही माझी गरज असणारच हे मला सुद्धा माहीत होते . मग तो मला अनेक काम सांगायचं . त्यात महत्वाचं म्हणजे दीड - दोन किलो मीटर अंतरावर असलेल्या संस्थेच्या अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष कडे जाऊन त्यांच्या रजिस्टर वर सह्या आणणे , रेकॉर्ड ठेवून येणे असे हे काम असत.
आमचं घर दोन माजली , वर च्या माळ्यावर मास्तर दादा च संस्था कार्यालय त्यात रोज चे कितीतरी लोकांचं येणं जाण , त्यांना पाणी द्या ते सुद्धा प्रत्येक वेळी ग्लास धुवून , पाण्यात हाथ , बोट टाकू नये , ग्लास थोडा कमी भरवा असे किती तरी सूचना भावाच्या असायच्या , निंबू सरबत वेवस्थी बिया काढून व थोडं मीठ टाकून बनवायचं , काचेच्या ग्लासात वेवस्थी धरून द्यायचं , येणाऱ्या जाणार्यांना , नमसकार म्हणायचं असे त्याने माझ्यावर तेव्हा पासूनच संस्कार केले होते . कधी शाळेचे शिक्षक , कधी वार्ड , गावातील कार्यकतें , कधी खेडे ग्रामीण भागातील पालक असे हि अखंड ये जा असे त्या मुळे मला फारसे इतर मुलं सारखे खेळायला , गल्लोगली हुंदक्याला भेटलेच नाही .
हो मात्र मी वेव्हार , समाज कार्य शिकत गेलो , दादा खूप पुस्तक आणायचा , त्याचे , बी ए , एम ए चे पुस्तक , समाजशास्त्र , राज्य शास्त्र , आणि अनेक मान्यवरांचे जीवन चरित्र , मार्क्स चे दास कॅपिटल असे किती तरी ग्रंथ माझे दहावीत असतानाच माझ्या दादा मुळे माझी वाचून झाली होती .
आणखी एक महत्वाची गोस्ट म्हणजे , ना विचारता , किव्हा न सांगून पैसे घ्यायचे नाहीत हा आमच्या घरचा अलिखित नियमच झाला होता त्या मूळे दादाने चार आठ आणे , रुपया जरी वरच्या माळीवर त्याचे टेबलावर ठेवला असला तरी आम्ही कोणीही भाऊ घेत नसो . एक दिवस निर्धन नावाचे आमचे शेजारी राहणारे काका वर आले त्यांनी थे असे चार अणे बघितले , तेव्हा तो म्हणाला अरे मी मागच्या पंधरा दिवसा पूर्वी आलो होतो ते चार आणे अजूनही जागचे जागीच दिसतात , दुसरी कडे ते केव्हाच मुलं घेऊन गेले असते !
लहान म्हणून एवढेच मला काम नसल्याची तर वड्या , कुरवळ्या बनवायची वेळ आली कि माझी माय मला पळसाची पानं टेकली वरून गोळा करून आणायला पाढवायची . एक मोठा थैला द्यायची . मग मी आमच्या घरा जवळच्या किल्ल्याच्या टेकडी कडे मोर्चा वळवायचा .
पळसाची पाने चांगली असली पाहिजे , मोठी पाहिजे , फाटली , किड्याने खाल्ली नसावी अस्या सूचना मग माझी माय द्यायची . कधी कधी मी म्हणायचो माझ्या पेक्ष्या मोठा भाऊ आहे त्याला पाठव , तेव्हा ती म्हणायची तो राहतो का घरी , आला कि पाळतो , जा न मा , इच मला माँ म्हणून भुरळ पाडायची आणि मग मी पळसाच्या पानाच्या शोधला निघायचा .
थोडी टेकली चढली कि आक्वलीचे झाड लागायची , पिकलेले आक्वल गोळ लागतात बार का . मग भीमी चे झाड , त्याला लागलेले निळे टपोरे डाळ डाळ वरचे घोष मी दाबून बघायचा त्यातून निळी शाई निघायची म्हणून आम्ही पोर त्यांना शाईचं झाड असे सुद्धा म्हण्याचे , कधी त्यांचे डहाळे हाथ धरून झुलायचे तेव्हा जणू टार्झनच झालो असे वाटायचे , कंबरमोडी च्या पांच्या रसाने जखमा बऱ्या होतात आम्ही लहान पणा पासून एकात आलो आहोत तेव्हा मोठे होऊन कंबरमोडीच्या पण पासून मलम बनवायचा आणि विकायचा असे हि आमच्या बाळ बुद्धीत येत असे . गुंत्याचे झाड म्हणजे वेली सारखेच , त्याची हि ४-५ झाड़ टेकडीवर होती , पडलेले मोठे मोठे गुंजे मी गोळा करायचा , वर्गातल्या पोरींना देण्या साठी .थोडा पाला भी न्यायाचा , फार मस्त गोड लागतो गुंज्याचा पाला , हिरवे छोटे पानं . पूर्वी गुंजे , कवड्यानं फार मोल होत म्हणे , सोन तर गुंजे मापात असायचं .
सीताफळीच्या झाड ना अजून फळ लागलेली नसायची , हो चिंच बिलायी ची गोल गोल जलेबी हिरवी , लाल झाली असायची . असं हे सगळं पाहत पाहत मी मग पळसाच्या झुडपे कडे मोर्चा वळवायचा . या पळसाच्या पानांना मी निरक्षूं भागात होतो कुठे पळसाला चार पान , दोन पण , सहा पानं भेटतात का म्हणून . एक एक चांगले पान खुड्याचे आणि निरीक्षण कार्टी जायचे असे चालत असे , थैला भरून जायचा मग मी घरी यायचो तेव्हा पर्यंत माझ्या माय च गव्हाच्या कुरवाल्या आणि पापड च स्वादिष्ठ रांधणं शिजवून झालं असे , पळसाच्या पानांना कपड्याने पुसून त्या वर साच्यातून कुरवाल्या पडल्या कि ते पान हळूच हाताने अलगद उचलून उन्हातल्या खाटीवर ठेवण्याचे काम सुद्धा माझे आणि माझ्या दोन लहान बहिणींचे असे
माझी माय आम्हला साच्यातून उरलेले गव्हा चे सांधणे दह्याची . केव्हा केव्हा आम्ही बहीण भाऊ सुद्धा चालबाजी करीत असू , पान वळवायला आणताना कुरवाली ,पापड मोडत असू मग आमची माय म्हणायची खाऊन घ्या . ती सर्व जाणायची !
असं हे किती तरी वर्ष चालत असे . एव्हाना मी सुद्धा एक चांगला निसर्ग संशोधक झालो होतो , माझाही शोध पळसाला पाने तीनच !
#जनसेनानी #Jansenani कल्याण
९ जून , २०१८
No comments:
Post a Comment