Tuesday, 5 June 2018

लघु कथा : मामाच्या गावाला जाऊ या मच्छी भात खाऊ या !

माझं नेटिव्ह गाव पवनी . भंडारा जिल्हातील एक मोठं गाव . वैनगंगा नदी काठी पूर्वेला वसलेलं . पवनी गाव म्हणजे मंदिराचे , तलावाचे , किल्ल्याचे , दोन वेळा आठवडी बाजार भरणार गाव , पाच पन्नास शेजारचे खेडे बाजार साठी इथे यायचे . मोठा बाजार .लहानपणी , फार मोठा वाटायचा , शिंगाडे , बोलंदे , जाया, खिरवणी ,चार, टेम्बाहर, उकडल्या भिश्या , चणे , मुरमुरे ,धानाचे लाडू घेऊन बसलेल्या ढिवरिणी जिकडे तिकडे , पैसे , दोन पैश्यात तेव्हा हे मुलांचे खाऊ भेटत असत.

माझा बाप तांदळाचा व्यापारी , गुजरी म्हणजे जे वार बाजाराचे नाहीत ते दिवस आणि बाजाराचे मंगळवार , शनिवार हे दिवस , या सर्व दिवशी दुकान मांडायचा . संध्याकाळी मी दुकानावर जायचा , बाजार घेऊन घरी जायचा . बाप पैसे , 2 पैसे द्यायचा त्याचा वेगवेगळा खाऊ घ्यायचा .

सहा भावात मीच लहान . माझ्या माय च माहेर नदीच्या त्या काठच्या गावाचं म्हणजे सिंधपुरीच . माझा आजा कोतवाल होता म्हणे साहेबानी दिलेला पॅन्ट , जुना कोट घालून कधी कधी घरी यायचा तेव्हा तो कवत ,बेल , तुरीच्या सेंगा , भुईमूंगाच्या ओल्या सेंगा, कच्चे , पिकले आंबे , बोर असे वेगवगडे सामान तो घेऊन यायचा . माझा आजा आला कि माझ्या माय च्या चेहऱ्यावर वेगडाच आनंद आणि हुरूप दिसायचा . आजा मात्र फारसा थांबत नसे .

अनेकदा माझा आजi माझ्या माय ला नेण्या साठी यायचा तेव्हा माझाच नंबर माझ्या माय बरोबर सिंधपुरीला जायला लागायचा .
माझ्या माय च माहेर म्हणजे लहानसं खेड . नदी पार केली थोडी पाण्यातून आणि बरीच वाळूतून कि आलं गाव . त्या गावचा पोरांचा खाऊ म्हणजे उकडले बोर , बोरकुट वडे , शेव , चिवडा ,

आमचा पाहुणचार म्हणजे गवाच्या कुरवाल्या , आमरस , ज्वारीची सोजी , मुंग , उडदाचे वडे . टोपली भर चोखायला गावठी आंबे , कधी , चुन भात , कधी वडी भात, कधी वडीत लहान झिंगे , कधी करवाड्या मच्चीचा रस्सा ,कधी सरंiग्या तर कधी काटवे .

सकाळीच गावची ठीवर नदी ची ताजी मच्छि दारा दारा वर यायचे , मस्त रस्सेदार मच्छि आणि भात ! असा असे आमचे मामाचे गाव ! आजही आठवतो आम्हाला तो मामाच्या गावाला जाऊया मच्छि भात खाऊया !

#जनसेनानी #Jnasenani कल्याण
६ जून , २०१८

No comments:

Post a Comment