Sunday, 17 June 2018

बाप :

बाप म्हणजे बाप रे बाप
घर जवळ आले कि खेकरायचे
आल्याची लांबूनच वर्दी द्यायचे
आम्ही पोर व्हायची सावधान
आणि माय म्हणायची पोतं आन

पैश्याची थैली माय ला द्यायचे
टोपी , शर्ट खुंटीला टांगायला
माझ्या कळे द्यायचे
पाणी पिऊन गडू ठेवायचे
चिलमीची छापी पाण्यानं भिजवायचे

तंबाकू टाकून माझ्या कडे द्यायचे
निवा टाकून आन म्हणून सांगायचे
मी चुली जवळ जायचो ,
चिमट्याने निवा घ्यायचो
विझू नये म्हणून एक दम प्यायचो

बाप बरोबर खूप ठिकाणी जायचो
बाहेरच जग निडरतेने पाहायचो
त्याचा बोट धरून चालत राहायचो
बापाच्या चेहऱया कडे राहून राहून पाहायचो

मारलं कधी नाही
डोक्यावर चढवलं नाही
पण नजरेचा धाक
असा होता माझा बाप !

#जनसेनानी #Jansenani कल्याण
१७ जून , २०१८ बाप दिवस

No comments:

Post a Comment