Sunday, 3 June 2018

विषाची परीक्षा नको सांगत आला !

या देशाचा मूळ मालक
जेव्हा जेव्हा आईच्या पोटातून
जन्म घेऊन बाहेर आला
तेव्हा तेव्हा मी नेटिव्ह, मी नेटिव्ह
असा टाहो फोडत जगात आला

त्याला कधी नाही पडला प्रश्न
कुठं आहे माझी मातृ भूमी
हक्क या भूमीवर तो घेऊनच आला
तेव्हा तेव्हा मी नेटिव्ह , मी नेटिव्ह
असा टाहो फोडत जगात आला

जेव्हा जेव्हा त्याला समजले
ब्राह्मण विदेशी तो म्हणत आला
आम्ही आदिवासी बोलत आला
तेव्हा तेव्हा मी नेटिव्ह , मी नेटिव्ह
असा टाहो फोडत जगात आला

आम्ही म्हणालो चाले जाव
तुम्ही म्हणाले ठहार जाव
गोरी पोरगी हो तो बताव
तेव्हा तेव्हा मी नेटिव्ह मी नेटिव्ह
असा टाहो फोडत आला
विषाची परीक्षा नको सांगत आला

#जनसेनानी #Jansenani कल्याण
४ जून २०१८

No comments:

Post a Comment