ती लेखनी नसेल तुमची , तर खुशाल मोडून टाका !
भीमकाय तोफेतून निघालेल्या लेखनीने शत्रू वर हल्ला करूया
मार्मिक शब्द फुलेंच्या गोळ्याने शत्रू विचार क्षे द घेऊ या
अभिनव तोफेच्या तोंडातून असंख लेखन्या बाहेर पडू द्या
जिभल्या पेनाच्या रक्त - शाई ने तर बितर होऊ द्या
अणकुचीदार बालपेन , निपा , टाकं, कुचल्याचे पीक येऊ द्या
हाताने , पायाने ,तोंडाने असाल अपंग , तरी लिहू द्या
भूक लिखाणाची युगायुगाची आता पूर्ण होऊ द्या
लिहा विचाराने असे , जगाला तुमचे कायल होऊ द्या
वाक्य गोफणीत कबीर ,भीम , फुल्यांचे शब्द टाका
खाल्ले शेत विदेशी पाखरांनी आता तरी त्यांना हाका
दाणा दाणा या भारत शेतातील तुमच्या कष्टाने फुललेला
गोफणीचे दगड कमी पडले तर तोफेचे गोळे फेका
तोफेतून निघाणाऱ्या असंख लेखण्यांनी असे विचार आणा आता
पेटवू शेतकरी, मजदूर, कवी, लेखक, स्त्रिया, बालके घ्या आणाभाका
संपेल या देशाचे नतद्रष्ट, दारिद्र्य, जाती, वर्ण, अस्पृश्यतेचे भयाण विश्व
ती लेखनी नसेल तुमची , तर खुशाल मोडून टाका !
#जनसेनानी #Jansenani कल्याण
No comments:
Post a Comment