लावणी : चंची :
तुमचा तंबाकू अन चुना ह्या नव्या चंचीत ठेवा ना
हि चंची लयी मुलायम बाई
ठेवायची असते हिला लयी घाई
बदामी आकार हिचा टाकताच
फुगते पाण्यानं भरली भिस्ती जसा
सुवर्ण चर्म मळवली ही
जरा नजर करून पहा ना
तुमचा तंबाकू अन चुना ह्या नव्या चंचीत ठेवा ना
हिला लावली आहे आतून झिप
नाही हिला भारी वस्तूचा सोस
टाकला तंबाकू चुना पकडून ठेवते घट्ट
काढता , टाकता सटासट तरी
पटकन बसते अगदी पुंन्हा फिट्ट
चुण्या तंबाकू च्यावासात मदहोश होते
जरा तोंड दाबून पिचकारी सोडा ना
तुमचा तंबाकू अन चुना ह्या नव्या चंचीत ठेवा ना
हि चंची सांभाळून ठेवा
ह्यात भरला आहे खरोखरच मेवा
वृदाया जवळच्या खिशात ठेवा
वाटतो सर्वाना हिचा हेवा
अन चोरांवर पाळत ठेवा
राहून राहून कुरवाळत धरा तिला
भरभरून तिच्यावर प्रेम करा
तुमचा तंबाकू अन चुना ह्या नव्या चंची ठेवा ना
#जनसेनानी #Jansenani कल्याण
२८ मे, २०१८
No comments:
Post a Comment