Friday, 25 May 2018

नमो नमो भारता ! :

नमो नमो भारता
मातृ पितृ भारता
सर्व श्रेष्ठ भारता
जग वंद्य भारता

ध्वज तिरंगी तुझा
कमल पुष्प तव करी
व्याघ्र तुझे वाहन असे
धम्मचक्र मेघ डंबरी
अभिमानाने उर भरी
रूप तुझे पाहता
नमो नमो भारता !

राष्ट्र मूल मालांची
राजमुद्रा अशोकाची
रंग छटा मयुराची
पुष्प वृष्टी गुलाबांची
पुनीत भूमी सांचीची
त्रिवार वंदन राष्ट्र देवता
नमो नमो भारता !

#जनसेनानी #Jansenani कल्याण
२६ मे, २०१८

No comments:

Post a Comment