Tuesday, 22 May 2018

लावणी : उमगलं काय ?

उमगलं काय ? मला घाई हाय
तुमचं वरातीच घोड जरा दटावा
अहो राया , अहो राया ----
मांडवी निरोप लगबगीनं पाठवा - दृ

जरा करा घोड्याची लगाम सैल
उचलून जराशी मांडी, प्रेमानं हळू टाचवा
अहो राया , अहो राया ----
मांडवी निरोप लगबगीनं पाठवा ---१

ढोलाचा उभार गोलाकार
अंदाज घ्या लावून हाथ हळूशार
आली उभारी होतं वरखाली
अहो राया , अहो राया ---
दांडा जरा मधातच वाजवा --------२

बेधुंद होऊ द्या तालावरती
धडकत काळीज ,उरवरखाली करती
चेक तयार झाला ,लवकर वटवा
अहो राया , अहो राया ----
मांडवी निरोप लगबगीनं पाठवा ----३

जनसेनानी , कल्याण
२३ मे , २०१८

No comments:

Post a Comment