Thursday, 31 May 2018

ऋतू राज वसंत :
ऋतू राज वसंत बहरूनी आला
गंध कोषी ने नवजीवन फुलवीत आला
घाणेरी पिवळी शेंदरी जाभंळी
फुलली करंजी , गुलमोहर , पारिंगी
मदन सहवासाचा रंग गुलाबी
ओठांवरती घरून आला
ऋतू राज वसंत बहरूनी आला
वड, पिपळ, कडुलिंब प्रणय घरकुले
फागुन मास पाना पानातून बहरे
चैत्र सुवास मोहरातून बरसला
गुंजन , प्रेम ऋतू प्रिया आला
ऋतू राज वसंत बहरूनी आला
रंग पिचकारी जणू तुडुंब भरली
दाबताच , कारंजे रंगी बेरंगी उडाली
गुलाल लागताना स्पर्श सुखावला
सर्वांगावर मधुमास फुलुनी आला
ऋतू राज वसंत बहरूनी आला
#जनसेनानी #Jansenani कल्याण
३१ मे, २०१८

No comments:

Post a Comment