Thursday, 31 May 2018

अर्धचंद्र :

अर्धचंद्र का दिला राजसा
काय माझा गुन्हा सांगना
उगवली असती रात पुनवेची
प्रियकरा थोडा थांबाना

कृष्ण पक्षाचा काळोख हा
संपणार होता एक दिवस
विश्वासाचा हा पंधरवाडा
जरा थोडा कढ काढाना
अर्धचंद्र का दिला राजसा

सांज वेळी चंद्र उगवतीला
मंद चांदण्या रात्र साथीला
तुज वीण रोज असेल माझी
जिणे विहिरणीचे जाणा ना
अर्धचंद्र का दिला राजसा

पटले असते तुझे माझे
असले समजले अंतकरणाने धागे
फुलले असते चांदणे पुनवेचे
प्रियकर परत हाक द्या ना
अर्धचंद्र का दिला राजसा

#जनसेनानी #Jansenani कल्याण
१ जून , २०१८

No comments:

Post a Comment