Monday, 28 May 2018

गांधी बापू :

स्वात्यंत्र भारता मिळविले
अभिनव मार्गाने
त्या शांती दूताने
गांधी बापूने !

विदेशी आक्रमक आले
एका मागून एक
पिळून भारता गेले
क्रूर कर्मे अनेक
सविनय कायदे भंगाचे
हत्यार उपसले
त्या महात्म्याने
गांधी बापूने !

लढले पण नाही थकले
सत्याचा मार्गची धरले
जाती अंता साठी
विदेशी ब्राह्मीनाशी झुंजले
प्राणाची आहुती देऊनी
स्वातंत्र देश्या मिळविले
त्या राष्ट्रपित्याने
गांधी बापूने !

१५ आगस्ट स्वात्यंत्र दिन
सुवर्ण अक्षरात कोरलेला
स्वात्यंत्र ,समता, बंधुत्वाचा
तिरंगा नभात फडकलेला
बघतो आम्ही भाग्यवंत
त्या सुपुत्राच्या बलिदानाने
गांधी बापूने !

#जनसेनानी #Jansenani कल्याण
२९ मे , २०१८

No comments:

Post a Comment