Thursday, 24 May 2018

प्रणय द्वंद गीत : सखे तुझ्या कटीच्या---
सखे तुझ्या कटीच्या त्या प्रणय मुग्ध चाली
मी आधार का न व्हावे बघुनी ते लावण्य ती लाली
सख्या तुझ्या प्रीतीच्या आलिंगना मी असुरली
मी मुक्त बंद झाले अन लाज हि मज आली
सखे तुझ्या कटीच्या ----
सख्या तुझ्या बाहूंच्या विळख्यात मी नाहली
तुझी हाक ऐकली अन मी बेधुंद जाहली
सखे तुझ्या पावलांची मंद चाहूल मज आली
हरवून मी स्वतःला तुझी धुंद मज झाली
सखे तुझ्या कटीच्या -------
सखे तुझ्या गालाच्या लालीची लागली मज ओढ
गुलाबी ओठ तुझे , नको म्हणू मिठी सोड
सख्या तुझ्या देहाची मी लिपटलेली लतिका
सुटेना पाश प्रेमाचा तुझा बलशाली विळखा
सखे तुझ्या कटीच्या ----
#जनसेनानी , #Jansenani कल्याण
२४ मे २०१८

No comments:

Post a Comment