Thursday, 31 May 2018

गझल : मय्यत :

जुलूस हा कुणाचा
खांद्यावरी का चालला
काय राम नाम होते
उदघोष का चालला

बांधली सकोली कोणी
पसरला तिथे कोण
बोलविले इथे कोणी
नाही येण्या जाण्याची वाण

घाई का नेण्याची
काय सुटली दुर्गंध
काय करावे सांगा
येईल ज्याने सुगन्ध

हीच का म्हणतात मय्यत
याचीच का तयारी जय्यत
नाते ते कोणत्या कामाचे
हीच का जिवाशिवाची संगत

काय चालले हे निघतात का
मय्यती मागून मय्यती
कशी मिळेल सांगा
अंतिमतः इथे सदगती

तिरड्या , सकुल्या फेका
मय्यती ला द्या अग्नी अन मूठमाती
चालू द्या असेच अविरत
इथे आहे सर्व नित्य नव्यासाठी

या मय्यती सरणा वर
पेटवा नव्या चुली
नव्या कायेत अग्नी भरा
होऊ द्या मय्यती मागून मय्यती

#जनसेनानी #Jansenani कल्याण


३१ मे , २०१८

No comments:

Post a Comment