Thursday, 24 May 2018

मनाचे नवे २० श्लोक :
मना प्रेम भावे उराशी धरावे
मना मित्रा सारखे नित्य वागवावे १

मना अति ओढणे कामा नये रे
मना ढील सोडणे योग्य नव्हे रे २

मना ज्ञान मार्गा वरीचा न्यावे
मनाचे प्रबोधन सातत्याने करावे ३

भटकंत्या मनाला दीर्घ स्वासाने धरावे
दुखी मनाला स्वासावार केंद्रित करावे ४

मनाला देव , दैव च्या नांदी लावू नये रे
मनशांती साठी गंडे तावीज घेऊ नये रे ५

मना सद् धर्म हेचि ज्ञान द्यावे
मनाला राग सोडूनि देण्यास सांगावे ६

तृष्णा मनात जोपासू नये रे
सहज तृप्ती हा मन शांती मार्ग आहे ७

मनाला शट रिपुच्या मार्गाला जाऊ देऊ नये रे
दुसऱ्याच्या सुखाला वाईट नजरेने पाहू नये रे ८

सर्व अनित्य आहे हे मना सदैव सांगावे
श्रुष्टी तील बदल उघड्या डोळ्यांनी पाहावे ९

पंच इंद्रियांना सम्यक दृष्टी द्यावी
मनाची शांती तिथे स्थिर धरावी १०

मनाला प्रेमाने व्ह्रदयाशी धरावे
सर्व कल्याणा मन अंतर्मुख करावे ११

खरी मन शांती मन विरक्तेने यावी
वायफळ बाळबळ सोडोनि द्यावी १२

मना प्रज्ञा वंत सदैव करावे
मना सदैव उत्तम ज्ञान द्यावे १३

कठोर मनाला नवनीत करावे
जन कल्याणाचा ध्यास मनी धरावे १४

दुःख मानणे व्यर्थ आहे मनाला सांगावे
सर्व समयी हसत , अन प्रसन्न मने राहावे १५

वैऱ्याचे हि सुख दुःख जाणावे
भ्रामक कल्पना मना सोडूनि द्यावे १६

सज्जनांचे संगतीत मन रामवावे
दुर्जनाची छाया मन वर पडू न द्यावे १७

दान , धर्म ,पुण्य मनाला सांगावे
हिंसा , चोरी , लबाडी मना सोडोनि द्यावी १८

आई ,वडिलांची सेवा मना अंतरी धरावी
बंधू , मित्र , आप्त याना मना मदत करावी १९

राम नाम मना सदैव अंतरी धरावे
राम हि सत्य मना पुन्हा पुन्हा सांगावे २०

#जनसेनानी #Jansenani Kalyan


२४ मे , २०१८

No comments:

Post a Comment