सर्व साक्षात ! :
तू आहेस सर्वांगाचा स्पर्श
कानातला आवाज , कंठातला नाद
डोळ्यातला प्रकाश, नाकातला वास
जिभेची चव , वृदयातला आनंद
तू आहेस म्हणून आहे सर्व काही
पण तुला मात्र कसलीही ओढ नाही
नको तुला नाव अन नाव लौकिक
नाही तुझे गाव, राष्ट्र , नाही तू प्रादेशिक
सर्व भाषा तुला चालतात
सर्व धर्म कर्म तुला उमगतात
तू आहेस सत्य कणाकणात
तू आहेस सर्व साक्षात !
#जनसेनानी #Jansenani कल्याण
No comments:
Post a Comment