Wednesday, 23 May 2018

ब्राह्मणी साहित्य :

रातराणी कविता तुमच्या, शब्द टपोरे फुललेले
गजरे , वेणी , लावण्य शब्द बापुडे अभिजन काव्य विणलेले
कधी लचक कमरा फेर काढती, कधी सुगंध ,अत्तर रुमाली मढलेले
कोण हे लोक ? , कुठली हि वस्ती ? प्रश्न नेटिवां पडलेले १

दैन्य, दारिद्र , दलित अस्तित्व जगी प्रस्थापित हे विसरलेले
बुद्ध ,फुले , कबीर , आंबेडकर, शाहू , शिवाजी न वळलेले
शेतकरी दादा , कष्टकरी आई महत्व तयाचे न कळलेले
समता , बंधुत्व ,स्वात्यंत्र ,माणुसकी बंध न कधी जुळलेले २

काव्य , कविता , लेख , साहित्य, मनू , गाडसे सजलेले
एकलव्य, कर्ण, सहस्त्रार्जुन, महानुभाव न पचनी पडलेले
सडकी डोकी , सडके विचार साहित्य तुमचे किडलेले
अभिजन , ब्राह्मणी साहित्य हे असेच, कुत्रही न हुंगा पडलेले ३

जनसेनानी , कल्याण
२३ मे , २०१८

No comments:

Post a Comment