Wednesday, 23 May 2018

लावणी : नवरदेव भाऊजी जरा धीर धरा :

ओल्या हळदीची नवरी आली घरा
नवरदेव भाऊजी जरा धीर धरा \ दृ

नव्या नवरीला करू नका घाई
तिला अश्या कामाची सोस नाही
समजून घ्या तिच्या भोळ्या भावना
आधी प्रेमाचा नजराणा करा
नवरदेव भाऊजी --जरा धीर धरा १

नव्या नवरीच्या हाथात हिरवा चुडा
भाऊजी तुमचा हाथ लयी रांगडा
नरम नरम कलायी नवरीची
जरा हळू हळू तुमचा स्पर्श करा
नवरदेव भाऊजी --- जरा धीर धरा २

नवरीच्या हाथाची मेहंदी सुरेख
घ्या हातात अलगद तिचा हाथ
दाखवा तिला प्रेमाची रेघ
हलके फुलवा तिच्या मनाचा पिसारा
नवरदेव भाऊजी --जरा धीर धरा ३

नव्या नवरीची लाज असे भारी
होऊ द्या थोडी नैनाची मस्करी
हळूच उचला पदर जरतारी
परदेश ची मैना आली तुमच्या घरा
नवरदेव भाऊजी -- जरा धीर धरा ४

#जनसेनानी #Jansenani Kalyan
२४ मे २०१८

No comments:

Post a Comment