माझी व्हेलेंटाईन :
किती नाव तुज ठेविले मी
किती उपमा तुज मी दिल्या
कधी दीपा म्हणुनी हाक मारली
कधी बैताड म्हणून मुका घेतल्या
रागावलो अनेकदा , रुसलो ,धरला अबोला
तू धिरोदत्त यामिनी , बोलता मज तू केला
तुझ्या स्मिताच्या हसऱ्या रेषा उमटता ओठावरी
देहभान विसरलो , विसावलो तुझ्या अनतरी
तू हट्ट कधी ना केला ना मागितली कधी साडी
मीच खुळा , दुबळा तरी करतो अनावश्यक लाथाडी
तुझा गंध अलौकिक सुगंध , नच केवळ देहाचा
तू सुंदर, सव्ह्रदयी, सौजन्यशील सुंदर केला संसार दोघांचा
तू मनोरमा , रंभा माझी अन बाया
नाव ठेविले असले जरी तुज अनेक
तूच माझी व्हेलेंटाईन ,प्रिय सखी
खरे सांगतो अर्धांगिनी दीपा प्रिया !
#जनसेनानी , #Jansenani कल्याण
No comments:
Post a Comment