मोहें पन घट पर नंदलाल छेड गयो रे म्हणू कसे
नदी वरचा घाट गेला
गेले तलावा वरचे धुणे
विहिरी वरचे पन घट गेले
आता हे झाले जुने
आता सांग कृष्णा
प्रेमाचे तुज खिलवू चणे कसे
मोहें पन घट पर नंदलाल छेड गयो रे म्हणू कसे
आडोश्याला भेटलो तर
काही टवाळ पोर करती राडा
फेसबुक ,वॉट्स अप देणे टाळा
दीड खोलीचं घर आमच
दुपारी असतो बगिच्याला टाळा
आता सांग कृष्णा
प्रेमाने तुज पाहू कसे
मोहें पन घट पर नंदलाल छेड गयो रे म्हणू कसे
#जनसेनानी #Jansenani कल्याण
२८ मे , २०१८
No comments:
Post a Comment