Friday, 25 May 2018

वीरांची पंढरी :

वीरांची पंढरी. भरली भीमा तीरी
आले नवं वर्ष , वाट कोरेगावची धरी --

दुःख , दैन्य अपार , पेशवाई काळी
लाजिरवाणे जिणे, अंतःकरण जाळी
आली इंग्रजांची हाक , झाले नाग वारकरी
वीरांची पंढरी , भरली भीमा तीरी

उठुनिया लढले , धारातीर्थ पडले
छातीचे केले कडे , पेशवाईचे पाडले तुकडे
आली जाग आता , स्वाभिमान भरला उरी
वीरांची पंढरी ,भरली भीमा तीरी

उठा भीम वीरांनो , कोरेगावा जाऊ
वीर पूर्वज आपुले , त्यांचा स्मृती स्तंभ पाहू
मानवंदना देऊ , नवं चैत्यन्य घेऊ
जागवू नवा समाज , नवे वारकरी होऊ
भीम प्रतिज्ञा हि आहे तुमच्या शिरी
वीरांची पंढरी , भरली भीमा तीरी .

#जनसेनानी #Jansenani कल्याण
२६ मे, २०१८

No comments:

Post a Comment