रंग माझा आगळा !
परवा माझं अन माझ्या मित्रच कड्याक्याच भांडण झालं
तो म्हणाला मित्र आता तुझं माझं पटणार नाही
तू चेतनावादी आणि आम्ही वास्तववादी एकत्र चालणार नाही
आज बोलतो पण उद्या पासून तुझ्याशी बोलणार नाही
तो म्हणाला तू ईश्वरवादी मी निरीश्वरवादी
तुझं माझं आता जमणार नाही , हे असं चालणार नाही
तू सांगतोस देवा धर्माच्या गोष्टी , सर्व ईश्वराची निर्मिती
तुझं थोतांड अन लबाड आता मी खपवून घेणार नाही
आज बोललो पण उद्या पासून तुझ्याशी बोलणार नाही
तो म्हणाला तुझी कबिरावर भक्ती , गौतम माझी शक्ती
तुझी बडबड आणि गडबड आता मी ऐकणार नाही
तुझा राम अन माझा भीम आता एकत्र मिळणार नाही
तुझी चेतना आणि माझी प्रज्ञा बरोबर होणार नाही
आज बोललो पण उद्या पासून तुझ्याशी बोलणार नाही
तो म्हणाला आता निर्वाणीचंच तुला सांगतो
तुझा पुनर्जन्म आणि आत्मा परमात्मा आता उरणार नाही
मी झालो शहाणा आता बावळट बरोबर जाणार नाही
तुझा मार्ग आणि माझा मार्ग कधी एकत्र येणार नाही
आज बोलतो पण उद्या पासून तुझ्याशी बोलणार नाही
मी म्हणालो मित्र तोडू नको असे मैतर बंध
तुझे माझे युग युगाचे अन रक्त मासाचे संबंध
तुझा गौतम आणि माझा शिव दोघे रक्ताचे भाऊ
ब्रह्मा ,ब्राह्मण , वेद नाही आपले सांगे संबंधी मी कुठे जाऊ
समजून घ्या मला , आपला संबंध युग युगाचा अन हाडा चा
माझा विचार जरी उना तरी तो कबीर , तुकाराम , रविदासचा
चेतनामय जग हे बुद्ध, शिव,राम, कृष्ण, कबीर नाही वेगळा
खरा वास्तववादी तर मीच आहे , पण रंग माझा आगळा !
#जनसेनानी #Jansenani कल्याण
No comments:
Post a Comment