गटारी :
देशी विदेशी , मोहाची , गुळाची , नवसागरीची
घेऊन आली हि सुरा -वीरांची गटारी
कुठे मटण , कुठे चिकन , कुठे वजडी
खाण्या पिण्या आली हि प्रिय गटारी
जिवा वरचे संकट आले श्रावण मासाचे
चार पाच श्रावण सोमवार उपवासाचे
कसली झंझट आम्हा पिणाऱया वर आणली
व्रत , उपवासाची चाल कुण्या गाढवाने काढली
कालच संध्यकाळी ऑफिस परतीच्या वेळी
घेऊन आलो हि अक्खी विदेशी बाटली
बाटली पाहून बायका आधी खेसकली
आज बाटली उद्या बायको आणणार ती बोलली
सकाळीच उठलो फटाफट तोंड धुतलो
चहाच्या कपात आज दारूचं घेतलो
सोडे पोह्याची ऑर्डर बायकोला सोडली
वर्ष भराची सवय एका क्षणात मोडली
दाढीला सुट्टी आणि आंघॊडीला बुट्टी
सकाळीच नाम्या , दाम्या , काम्या आले
त्यांचे बरोबर माझ्या बाटलीतील चहापान झाले
आधी माझ्या घरी , मग त्याच्या घरी सुरू झाले
झिंगलेल्या दोस्ता बरोबर दंगा मस्ती करत होतो
बायको पोरांना विसरुंन गल्ली गल्लीत फिरत होतो
संध्या रात्र झाली तेव्हा बायकोला माझी आठवण आली
तो पर्यंत प्रिया गटारीची नशा होती पूर्ण चढली
बरीच रात्र सारली पण स्वारी अजून नाही उतरली
चिंतातुर घरची मंडळी पडली , बायलो रागाने फणफणली
तेव्हा पोरांनी आणली उचलून एक चिखलाने माखलेली स्वारी
बघितले बायकोने, घरचा होता गटारीत लोडून आलेला भिकारी !
#जनसेनानी #Jansenani कल्याण
No comments:
Post a Comment