स्वात्यंत्र देवते :
स्वात्यंत्र देवते तुझ्या कृपेने
सुख आले या दारी
झोपडी माझी उजडूनी गेली
प्रभा फाकली सोनेरी
शतका मागून शतके गेली
होतो आम्ही रंजले गांजले
झाली कृपा तुझी माउली
बोलू लागले मुकी लेकरे
लोकोत्तर पुरुष्यानी लढे देऊनी
जागविली अमुची अस्मिता
सिंहाचा जबडा उघडण्या
जाण आणली भारता
गंध कुटी मधून चरखा बापूचा
क्षणभर विसावला तुझ्या स्वागता
गरगरला परत नव तेजाने
घेऊन नवा धागा एकात्मतेचा
घटनेची भरजरी साडी
वर लोकशाहीची चोळी
हाथ घालील कोण नराधम
करू त्याची खांडोळी
प्रसन्न वदने अमर होऊनि
या भारत भूवर तू राहावे
पारतंत्र्य आता कधी न यावे
माता असा आशीर्वाद द्यावे !
#जनसेनानी #Jansenani कल्याण
No comments:
Post a Comment