आत्मा :
नाजुकश्या डहाळी वरच्या
एकाद्या इवल्याश्या फुलाला
नर्म दिल दोन बोटानी
संवेदनशील हाथाने
सर्वभूती अंतःकरणाने
हळुवार नजाकतीने
कमीत कमी ताकत लावून
अति लवचिक होऊन ओढा
तेव्हा ते फुलं आणि ती डहाळी
किंचित ताणली जाईल
त्या ताणाला
करोडो अब्जो पटीने भागा
जो भागाकार येईल तोच आत्मा !
एखाद्या डुक्कराला
घाणीवर चरताना
एक दगड उचलून
जरा त्याचे दिशेने भिरकावून
त्याला घाबरवून
त्याला पळवून
त्याच्या तोंडून निघालेला
तो आवाज , ती किंकाळी
जरा मापात घ्या
त्यात करोडो , अब्जो पटीने
हवा मिसळा त्याचा एक रेणूत
त्याचे म्हणणे , अंतकरणाने
जरासे भावुक होऊन
त्याच्याशी तादाम्य पावून
जरा ऐका तो आवाज
हा जो आवाज तोच आत्मा !
जरा आता स्वतः कडे बघा
शरीरभर नजर फिरवा
हाथाला हाथ लावा
नाक तोंड कान डोळे
बरोबर आहेत का ते बघा
तुमच्या मांडी वरच्या एका केसाला
जरा निरखा , दोन बोटाने कुरवाळा
जरासे उंच उचलून सरळ करा
जरा वर उचला , जरा ताणा
तेव्हा उभा राहतो संवेदनांचा बाणा
त्या बाण्याला करोडो अब्जो पटीने
कमी करा
जे उरले तोच तो आत्मा !
#जनसेनानी #Jansenani कल्याण
No comments:
Post a Comment