पांडुरंग ,पांडुरंग ,पांडुरंग ! :
पांडुरंग , पांडुरंग , पांडुरंग , पांडुरंग
माझा मोठा भाऊ माझा श्रीरंग
त्याने केले शहाणे ,सुसंस्कार घडविले
शिक्षणा प्रवृत्त केले , ज्ञान गोडी वाढविले
अप्रत्यक्ष सांभाळिले , सर्व लाड पुरविले
नाही घडू दिला निसंगाशी संग
माझा मोठा भाऊ माझा श्रीरंग
पेशाने हाडाचा शिक्षक , नित्य ज्ञान उपासक
पुस्तकांचा संग्राहक , समाज कार्याचा वाहक
कुटुंबाचा खरा तोचि सुजाण चालक
सदा कार्य मग्न , सुख दुःखात सदा संग
माझा मोठा भाऊ माझा श्रीरंग
शिक्षण संस्था काढली , वसतिगृहे वाढविली
सेवाव्रती तो निष्कलंक ,निर्मल धुरा सांभाळली
आवश्यक तेव्हा सर्व पदेही स्वेच्छा सोडली
त्यागीवृत्ती बाणा , स्वाभिमानी अंग
माझा मोठा भाऊ माझा श्रीरंग
जीवनसंगिनी सुयोग्य लाभली
वाहिनी शांता पुष्पा आई जणू घरी आली
समविचारी ,सम पेशा सम्यक जोडी जमली
दोघेही झाले सर्वांचे भले करण्यात दंग
माझा मोठं भाऊ माझा श्रीरंग
प्रतिभा , सतीश मुले कुटुंब वेली आली
नातवंडांचे दोघेही आजी आजा झाली
सुख दुःखाच्या अनेकदा चुक्चुक्ल्या पाली
जीवन हे असेच सांगतो तो पांडुरंग
माझा मोठा भाऊ श्रीरंग
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग
#जनसेनानी #Jansenani कल्याण
No comments:
Post a Comment