Friday, 25 May 2018

एक होता वानर :

एक होता वानर, जंगलातील एका पाड्यावर तो राहायचा
झाड झुडपावर उड्या मारून गल्लीत माकड चेष्ठा करायचा
एक दिवस त्याचा झाला शाळेत वावर
पण नव्हते त्याला माहीत शाळेचा पावर
तो मुलांचं बघून अनुसरण करायचा
मुलांनी सांगितलं तर ए बी सी म्हणायचा
वानरा वानरा म्हणून हूप हूप म्हणून मुलं चिडवायची
तुझ्या शेपटीला मण भर तूप असं त्याला म्हणायची
वानर होता मात्र मनाचा पक्का
विध्येचा होता तो भोक्त सच्चा

मुलं बसायची वर्गात
वानर राहायचा पडाव्यात
गुरुजीने विचारले उत्तर
तर वानर असे तत्पर
दिवसा मागून दिवस गेले
मुले हि वानर सह मिसळले
आई ला थोडा अधिक डबा मागू लागले
त्या वानरा सह फराळ खाऊ लागले

कुणी आणली जुनी शर्ट पॅन्ट
कुणी दिली त्याला टोपी छान
पायाला बूट कुणी तरी दिले
आता हा वानर मुलां परी चाले
मग आली तिमाही आणि सहामाही
गुरुजींना कळली त्याचीही चतुराई
त्यांनी ठरविले द्यायचे वानराला शाळेत दाखला
विकासाचा प्रयोग होईल बरं का हा पहिला

गुरुजींनी वानरला नाव दिले हनुमंत
शाळा शिकेल तर तोही होईल बरं का श्रीमंत
गुरुजींनी फाइनल ला त्याला बसविले
वानराने आपलं शेपट कमरेला गुंडाळिले
मग एक दिवस आला परीक्षेचा निकाल
पास झाला हनुमंत खुलले सर्वांचे गाल
मग लेकाचा मॅट्रिक झाला, बी ए झाला , बी एड झाला
एका शाळेचा शिक्षक म्हणून त्याला काल आला
आता हा आपला हनुमंत, आदिवाशी, वनवासी, वानर, मास्तर आहे
विध्येने वानरांचा माणूस होतो हे डार्विन अन फुलेच म्हणणं खरं आहे !

#Jansenani #Jansenani Kalyan
२५ मे , २०१८

No comments:

Post a Comment