Saturday, 26 May 2018

सांगून गेले भीम - ज्योती !

आठवा अनाथपिंडकाची कहाणी
आठवा ती सुवर्णनांची नाणी
वेवसाय व्यापार धन संपत्तीची खणी
बंधुनो खूणगाठ बांधून ठेवा मनी

कसला करता टाटा अन बाटा
खुशाल द्या त्यांना फाटा
तोडु नका घरच्या घरी खाटा
संपत्ती शास्त्र लयी भारी
काढा शत्रूचा त्याने काटा

होऊ नका बंधुनो आळशी
कसला पंचांग तिथी काढशी
का राहता मालक असून उपाशी
का न धरता वेवसाय वृदयाशी

उद्योगांची मोठी गती
नाही नौकरीची भीती
का मेहनतीला घाबरती
सांगून गेले भीम - ज्योती !

#जनसेनानी #Jansenani कल्याण
२७ मे, २०१८

No comments:

Post a Comment